बाणेरमध्ये धक्कादायक प्रकार!! बनावट दस्तऐवज तयार करून कोट्यवधीची जमीन परस्पर खरेदी विक्री, मोठ्या व्यावसायिकासह 10 जणांवर गुन्हा दाखल…

पुणे : पुण्यात खळबळ माजवणारी घटना सध्या पुढे आली आहे. बांधकाम व्यवसायिकांनी घेतलेली जमीन पुण्यातील दुसऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाने परस्पर बनावट दस्तऐवज करून हस्तांतरित केली, खरेदी केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून याबाबत तपास सुरू आहे.
याबाबत चतुशृंगी पोलीस ठाण्यात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कीर्ती डेव्हलपर्स या कंपनीचे मालक सी.पी. मोहनदास यांचा बाणेरमध्ये सहा गुंठे मोकळ्या जमिनीचा प्लॉट आहे. ही जमीन त्यांची बहीण रत्नाबाई टी राधाकृष्णन यांनी मूळ मालक सोपान गणपती मुरकुटे यांच्याकडून सन 1994 मध्ये खरेदी केली होती.
असे असताना बाणेर येथील तलाठी कार्यालयातून काही महिन्यांपूर्वी उतारा काढला असता सातबारा उताऱ्यावर देन्स इन्फ्रास्ट्रक्चर एलएलपी तर्फे अमर नामदेव शिंदे या नावाची नोंद कब्जेदार सदरी झाली होती व पूर्वीचे मालक रत्नाबाई राधाकृष्णन यांच्या नावापुढे कंस झाल्याचे दिसून आले. यामुळे मोठी खळबळ उडाली.
याबाबत अधिकचा तपास सुरू करण्यात आला. नंतर किर्ती डेव्हलपर्स कंपनीने याची माहिती घेतली व त्याचे दस्त काढून घेतले. तेव्हा एक कोटी 75 लाख रुपयांना ही जमीन अमर शिंदे या नावाने खरेदी झाल्याचे दिसून आले. यामुळे त्यांनी तपास केला.
असे असताना या खरेदी खताची नक्कल काढल्यानंतर हवेलीच्या दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट कुलमुखत्यारधारक उभे करून या प्लॉटची परस्पर खरेदीखत झाल्याचे दिसून आले. याद्वारे शासनाची फसवणूक केल्यावरून चतुशृंगी पोलीस ठाण्यात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या सगळ्या प्रकरणात यामध्ये पुण्यातील एका बड्या बांधकाम व्यवसाय कंपनीचा देखील समावेश आहे. याबात सध्या पोलीस तपास करत असून याबाबत पोलिसांनी अनेकांची चौकशी देखील सुरू केली आहे.