धक्कादायक! बदलीसाठी डेपो मॅनेजरची महिला कंडक्टरकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने नकार दिला अन्….

मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बेस्टमधील महिला कर्मचाऱ्याकडे डेपो मॅनेजरने कामाच्या बदल्यात शरीर सुखाची मागणी केली आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात असून याबाबत कारवाईची मागणी केली जात आहे. या महिलेने शरीर सुखास नकार दिल्याने मॅनेजरने दुसऱ्या आगारात महिलेची बदली केल्याची घटना घडली आहे.
यानंतर या महिलेने तक्रार करूनही पोलिसांनी मॅनेजरवर कोणतीही कारवाई केली नाही. याबाबत माहिती अशी की, मॅनेजर लुईस फर्नांडिसने कामाच्या बदल्यात पीडित महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. शरीर सुख देण्यास नकार दिल्याने महिलेची सांताक्रुज आगारात बदली करण्यात आली.
घडलेल्या प्रकारानंतर तिला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकीही फर्नांडिसने दिली. यानंतर या महिलेला न्याय देखील देण्यात आला नाही. तिने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी फर्नांडिसवर कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
उलट गुन्हा मागे घेण्यासाठी फर्नांडिसने महिला कंडक्टवर दबाव टाकला. आता बेस्ट प्रशासन लुईस फर्नांडिसवर कोणती कारवाई करणार? पोलीस प्रशासन फर्नांडिसला अटक करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या कंडक्टर महिलेचा व्हिडिओ समोर आला आहे.
या व्हिडिओतून महिलेने डेपो मॅनेजर लुईस फर्नांडिसवर गंभीर आरोप केले आहेत. याबाबत पोलिसही कारवाई करत नसतील, तर जनतेनं कुणाकडे दाद मागायची? असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले असून कारवाई करून अटक करण्याची मागणी केली जात आहे.