सातारा डॉक्टर हत्या प्रकरणात कुटुंबियाचा धक्कादायक दावा ; वारंवार पोलिसांकडून तिला त्रास..


सातारा: साताऱ्यातील फलटण येथे कार्यरत महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणात धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. याप्रकरणात आता मुंडे यांच्या कुटुंबियांनी मोठा दावा केला आहे.तिच्याकडून (संपदा मुंडे) आम्हाला सांगण्यात आले होते की, पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी तिला पोलिसांकडून वारंवार त्रास दिला जात होता, तिने याबद्दल आम्हाला सांगितले होते असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे आता त्या पोलिसांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महिला डॉक्टर संपदा मुंडे हीने तळहातावर एक संदेश लिहून स्वत:चे आयुष्य संपवले. आपल्याला काय त्रास होत होता हे तिने हातावर लिहित थेट आरोपींची नावेही लिहिली.संरक्षण करणाऱ्या पोलिसांमुळेच तिला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले. हेच नाही तर आरोपी पीएसआय गोपाळ बदने याने 4 वेळा आपल्यावर बलात्कार केल्याचेही तिने म्हटले आहे.दरम्यान आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल संपदा मुंडे यांनी यापूर्वी आरोपीबद्दल तक्रार दिली होती. मात्र, तिला पोलिस विभागाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. आता संपदा मुंडेच्या आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप करत मोठी मागणी केली. आत्महत्या की, हत्या या अॅंगलने तपास करा. आठ दिवसांच्या आत एसआयटी स्थापन करून चाैकशी करा असं कुटुंबीयांनी म्हटल आहे.

डॉक्टर संपदा हिच्या आई-वडिलांनी अत्यंत गरीब परिस्थितीतून मुलीला शिकवले आणि डॉक्टर केले. एका पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार तसेच अन्य पोलीस अधिकाऱ्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचे आरोप करत तिने तळहातावर बरेच गंभीर आरोप करत आयुष्याचा शेवट केला आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!