धक्कादायक! पुण्याच्या मुळशीतील व्यक्तीचा पडिक इमारतीत लटकलेला मृतदेह आढळल्याने खळबळ, आत्महत्येच कारण अस्पष्ट


पुणे : पुणे-सातारा महामार्गाजवळ असणाऱ्या कापूरहोळ येथील एका पडीक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एका व्यक्तीचा मृतहेद आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.या व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,गणेश प्रकाश भोकरे (वय ४३) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. हा व्यक्ती मुळशी तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. कापूरहोळ परिसरातील काहीजणांना तेथील पडीक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एका व्यक्तीचा मृतदेह दिसला. हा मृतदेह नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने इमारतीवर लटकत होता. मृतदेह दिसल्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांनी घटनेची माहिती दिली. त्यानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले.नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. संबंधित व्यक्तीच्या खिशात आधार कार्ड सापडले असून त्यावरुन त्या व्यक्तीचे नाव आणि इतर माहिती मिळाली आहे.

दरम्यान मुळशीतील या व्यक्तीने केलेल्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. भोरच्या राजगड पोलीस स्टेशनकडून घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!