धक्कादायक! तारापूर औद्योगिक वसाहतीमधील गॅस गळतीत 4 कामगारांचा मृत्यू तर 2 जखमी..

पुणे : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील मेडली फार्मासिटीकल कंपनीमध्ये गळती झाल्याने कामगारांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या गळतीमुळे चार कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातल्या तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये ही दुर्घटना घडली आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट नंबर एफ 13 मध्ये मेडली फार्मासिटीकल कंपनी आहे, या कंपनीमध्ये ही दुर्घटना घडली. वायू गळतीमुळे सहा कामगार बेशुद्ध झाले होते, त्यातील चार जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे, तर दोन जणांना तातडीनं येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला, वायु गळतीचं नेमकं कारण काय आहे? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
दरम्यान कल्पेश राऊत, बंगाली ठाकूर, धीरज प्रजापती आणि कमलेश यादव असं या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांचं नाव आहे, तर रोहन शिंदे आणि निलेश हाडळ असं या अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींची नाव आहेत, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील मेडली फार्मासिटीकल कंपनीमध्ये गळती झाल्याने कामगारांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या गळतीमुळे चार कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.

