Shirur : चिंचणी येथील वाळू माफियांविरोधात जोरदार कारवाई करणार, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांचा वाळू माफियांना थेट इशारा…

Shirur : शिरुर तालुक्यातील चिंचणी येथील घोडधरण जलाशयातुन यांत्रिक बोटीच्या सहाय्याने बेकायदेशीर वाळू उपसा तसेच विक्री होत असल्याचं उघडकीस आला होता.
तसेच हि बाब शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने तेथील मंडळ अधिकारी नंदकुमार खरात यांना स्थळ पाहणी करुन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने मंडळ अधिकारी यांनी स्थळ पाहणी करुन शिरुर पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याने यांत्रिक बोटीच्या सहाय्याने वाळु काढुन चारचाकी वाहनातुन चोरुन नेल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Shirur
तसेच यापुढेही जर चिंचणीच्या घोडधरण जलाशयात वाळु उपसा करणाऱ्या बोटी आढळल्यास त्या बोटी फोडण्यासाठी पथके तयार करुण यंत्रणा सज्ज कली असून तात्काळ योग्य ती कारवाई केली जाईल असे शिरुरचे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी अशी माहिती दिली आहे.