मोठी बातमी! शरद पवार गटाचा शिलेदार अडचणीत; लोकसभेचं तिकीट जाहीर होताच मोठी कारवाई


Maharashtra politics : शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. अशातच लोकसभेचं तिकीट जाहीर होताच शरद पवार गटाचा शिलेदार अडचणीत सापडल्याची माहिती समोर आली आहे.

भिवंडी लोकसभा मतदासंघासाठी सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण म्हात्रेंच्या गोदामांवर एमएमआरडीएकडून कारवाई केली जाणार आहे. लवकरच येवई येथील आर के लॉजी पार्क येथील गोदाम बांधकामांवर एमएमआरडीए कारवाई केली जाईल. त्यामुळे लोकसभेपूर्वीच सुरेश म्हात्रे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

यावर सुरेश म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संपूर्ण तालुक्यातील गोदाम बांधकामांना संरक्षण देण्यासाठी शासनाने अध्यादेश काढले असून त्यानुसार सर्व बांधकाम संरक्षित करण्यासाठी प्रस्ताव दाखल केला आहे.

उच्च न्यायालयातून स्थगिती आदेश घेतले आहेत. गोदाम व्यवसायातून ९० हजार तरुणांना रोजगार उपलब्ध झाला. तालुक्यातील अनधिकृत गोदाम व्यवसाय भ्रष्टाचाराची जननी कपिल पाटील हेच आहेत,” असा आरोपही सुरेश म्हात्रे यांनी केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!