हवेली , इंदापूर, दौंड तालुक्याच्या शेतीक्षेत्राला दिलासा ! खडकवासला प्रकल्पातून आजपासून शेतीला आवर्तन ..!!

पुणे: खरीप हंगामासाठी खडकवासला धरणातून रविवारपासून नवीन मुठा उजवा कालव्यातून विसर्ग केला जाणार आहे. एक हजार क्युसेकने हे पाणी सोडण्यात येणार आहे.
खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील पाणीसाठा १३.२६ टीएमसी झाला आहे. तर खडकवासला धरण ७१ टक्के भरले आहे. जूनअखेरीस हा पाणीसाठा ३.५० टीएमसीपर्यंत होता. मात्र, मागील तीन आठवड्यांत चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे जवळपास दहा टीएमसी पाणी वाढले, तर खडकवासला धरण भरण्याच्या मार्गावर आहे.
मागील २४ तासांत पावसामुळे पाऊण टीएमसी पाणी वाढले आहे. खडकवासला १.४० टीएमसी (७१ टक्के), पानशेत ५.६० टीएमसी (५३ टक्के), ५.०१ टीएमसी (३९ टक्के) तर टेमघर धरणात १.२५ टीएमसी (३४ टक्के) पाणीसाठा आहे. पाण्याची वाढ सातत्याने होत असल्याने पाणी नदीत सोडण्याऐवजी कालव्यातून सोडण्यात येणार आहे.
Views:
[jp_post_view]