‘ती टाकते काही मिनिटात रांगोळ्यांच्या पायघड्या’! पालखी सोहळ्यात तीच्या रांगोळ्या संख्या बघताल तर होताल थक्क…


लोणी काळभोर: संतशिरोमणी तुकाराम महाराज पालखी सोहळयाचे लोणी काळभोर येथून यवतच्या दिशेने प्रस्थान झाले. त्यावेळी एका सर्वसामान्य दिसणा-या तरुणीने पालखी मार्गावर काही वेळात काढलेल्या आकर्षक रांगोळ्यांनी वारकरी व दर्शनासाठी थांबलेले भक्तगण थक्क झाले होते.

हि किमया जुन्नर तालुक्यातील धोलवड गावची युवती पूजा अमोल काळे साधत आहे. पालखी मार्गावर कसलेही रेखाटन न करता अवघ्या दोन ते तीन मिनिटात अतिशय सुंदर विविधरंगी रांगोळी ती काढत होती. रांगोळी काढताना त्यात वेगवेगळे रंग भरल्यामुळे रांगोळी अतिशय आकर्षक दिसत होती.

यासंदर्भात पुजा काळे हीने सांगितले की देहु ते पंढरपूर पर्यंतच्या पालखी मार्गावर आपण रांगोळीच्या पायघड्या टाकणार आहोत. तुकाराम महाराजांच्या ३४० व्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने लोणी काळभोर ते यवत या ३० मैल अंतरामध्ये ३४० रांगोळीच्या पायघड्या टाकणार असल्याचेही तिने सांगितले.

अधिक माहिती देताना ती पुढे म्हणाली की देहु ते पंढरपूर या मार्गावर पायघड्या टाकण्यासाठी साडेचार टन रांगोळी व विविध रंगाची गरज आहे. या सेवेसाठी देहू संस्थानने साडेचार टन रांगोळी दिली आहे.

आजच्या दिवशी ३४० रांगोळ्या काढण्याचे ध्येय वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रोसेस मध्ये असल्याचे पूजा काळे हिने सांगितले. रांगोळी व रंगासाठी देहू संस्थानने मदत केली असली तरी इतर खर्चासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचे तिने सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!