मुंबईत शार्प फायनान्सियल सर्व्हिसेसचा दिमाखात प्रारंभ! ५ वर्षात देशभर ५०० शाखा उघडणार – राजाराम देशमुख
मुंबई : मुंबईत नव्याने शार्प फायनान्सियल सर्व्हिस लोकांच्या सेवेत रुजू झाली असून या उद्योगाच्या माध्यमातून विविध आर्थिक सेवा पुरवल्या जाणार आहेत.पुढील पाच वर्षात देशभरात शार्प फायनान्सियलच्या ५०० शाखा सुरु करण्याचे उदिष्ट्य ठेवले आहे, अशी माहिती शार्प फायनांसियल सर्व्हिसेस प्रा. लि. चे संस्थापक व सिध्दीविनायक देवस्थानचे विश्वस्त राजाराम देशमुख यांनी दिली आहे.
काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी महसूल मंत्री तसेच विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शार्प फायनांसियल सर्व्हिसेस प्रा. लि.या उद्योगाचे उद्घाटन करण्यात आले. राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे, अभिनेते व सिद्धीविनियक देवस्थानचे अध्यक्ष आदेश बांदेकर, जगद्गुरू कृष्णाचार्य महाराज ,माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकरसिंह.
इंडिया बुलियन आणि ज्वेलर्स असोशिएशनचे अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी, चित्रपट निर्माती एकता कपूर, चित्रपट निर्माता मधुर भंडारकर , अभिनेते विजय पाटकर, अभिनेते नागेश भोसले, ,विक्रम गेडाम, नरेंद्र हिरावत,सूरज सिंह, मितेश बाबरिया, राजेंद्र बग्गा, डॉ. जयकृष्णा पाठक, सुधिरभाऊ साळवी, युवा नेता सिद्धेश कपिल पाटील, उद्योगपती कनैया कक्कड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी उपस्थित राहून नव्या व्यवसायाला शुभेच्छा दिल्या.
दरम्यान शार्प फायनांसियल सर्व्हिसेस प्रा. लि. चे मुंबई स्थित कार्यालय इंडस्ट्री मनोर, ए. एस. एम. मार्ग, सेच्युरी भवन, प्रभादेवी मुंबई येथे आहे तर विठ्ठल मांडवकर हे सीईओ व एमडी आहेत.