शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते, मग मराठ्यांना का आरक्षण दिले नाही, देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवार जोरदार हल्ला .. !!


 

पुणे : पुण्यात भाजपचे महाअधिवेशन सुरु आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अधिवेशनात विरोधकांवर जोरदार हल्ला चढवितआहे. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना खोटे नेरेटिव्ह पसरविण्याबद्दल सुणावलं असून भाजप कार्यकर्त्यांना त्याच भाषेत उत्तर द्या असे ठणकावून मैदानात उतरा आणि ठोकून काढा असा इशारा दिला आहे.

फडणवीस यांनी विरोधक मराठा आरक्षणावर गैरसमज पसरवित असल्याचे सांगून मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण हे
जनतेला पटवून सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यांनी थेट शरद पवार यांच्यावर हल्ला चढविला आहे. ते म्हणाले, ”अण्णासाहेब पाटलांनी जर १९८२ साली स्वत:ला गोळी झाडून घेतली होती. तुम्ही चार वेळा तिकडे रेकॉर्डवर सांगितले. मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही. मी नाही बोललो, कोण बोललेय हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि चार वेळा पवारसाहेब स्वत: मुख्यमंत्री होते, का मराठा आरक्षण दिलं नाही? आता मतांकरता दुफळी निर्माण करण्याचं काम सुरु आहे. दोन समाजामध्ये पेट्रोल टाकण्याच काम काही नेते करतायत”, असा आरोप फडणवीसांनी शरद पवारांवर केला.

ते पुढे म्हणाले, ”हो आम्ही आरक्षण दिलं. आणि आरक्षण देऊत ते हायकोर्टातही टिकवलं.आणि जोपर्यंत आमचं सरकार होतं सुप्रीम कोर्टात तीन वेळा सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने स्टे द्यायला नकार दिला.सुप्रीम कोर्टातही आरक्षण आम्ही टिकवलं.पण दुदैवाने शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि आरक्षण गेलं.त्याला टिकवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही”, अशी टीका फडणवीसांनी ठाकरे आणि पवारांवर केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!