शरद पवार फक्त नावानेच हिंदू, त्यांनी धर्मांतर करून मुस्लिम व्हावं! भाजप नेत्याची जहरी टीका
मुंबई : भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी एक ट्विट केले आहे. त्यांनी शरद पवार यांचे मुघल शासक औरंगजेबाचा पुनर्जन्म असे वर्णन केले. जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा शरद पवार मुस्लिमांची चिंता करू लागतात, असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच औरंगजेबचा पुनर्जन्म झाला की काय असे मी बोललो त्याच्यामध्ये चुकीचे काय आहे? औरंगजेब पण मुस्लिम धर्माला बनवण्यासाठी जे शक्य होतं ते सगळं करायचा, हेही तसंच वागतात, असे निलेश राणे म्हणाले. यामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
शरद पवारांनी मुस्लिम समाजामध्ये जावो. त्यांनी केलेले हे धर्मांतर आम्हाला चालेल, असे देखील नितेश राणे म्हणाले. त्यांच्या या टिकेला आता सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे.
त्या म्हणाल्या, आपल्या वडिलांच्या वयाच्या व्यक्तीबद्दल असे बोलणे हे लज्जास्पद आहे. त्यांच्या वागण्यातून त्यांची संस्कृती दिसते. यामुळे आता प्रकरण वाढणार की मिटणार हे येणाऱ्या काळात समजेल.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात वारंवार धार्मिक-जातीय तणावाच्या घटना घडत आहेत. पुन्हा एकदा संगमनेर आणि कोल्हापूर येथे जातीय तिढा निर्माण होतील अशा घटना घडल्या आहेत.