Sharad Pawar : हा आत्मा तुम्हाला सोडणार नाही!! शरद पवार यांनी मोदींना दिलं थेट चॅलेंज, सभेत नेमकं काय घडलं?
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रस पक्षाच्या २५ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अहमदनगरमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या मेळाव्यात पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
राजकीय पक्ष म्हणून आम्ही एकमेकांवर टीका करतो. पण टीका करताना आम्ही मर्यादा ठेवतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्याबाबतीत काय बोलले? की भटकती आत्मा. माझ्याबद्दल त्यांनी उल्लेख केला की, हा भटकता आत्मा आहे.
एका दृष्टीने हे बरं झालं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा हा कायम राहतो. हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही. कारण तो कायम त्या ठिकाणी राहणार आहे, असा घणाघात शरद पवार यांनी केला.
बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणासाचा आत्मविश्वास वाढला. मोदींनी शिवसेनेचा उल्लेख करताना ही नकली बापाची संघटना असा केला. त्यांना हे बोलणे शोभतं का? एखाद्या संस्थेला, एखाद्या व्यक्तीला आणि व्यक्ती समूहाला त्यांची पार्श्वभूमी नकली आहे हे पंतप्रधानांनी बोलायचं? याचा अर्थ हा आहे की, त्यांना तारतम्य राहिलेले नाही. Sharad Pawar
जे झाले ते विसरुया. आपण नव्या विचाराने जाऊया. आपण हा देश कसा प्रगतीच्या रस्त्यावर न्यायचा त्याचा विचार करुया. ते करण्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला करावी लागेल. संघटना मजबूत करावी लागेल.
समाजातील दलित वर्ग आहे, अल्पसंख्याकांचा वर्ग आहे, महिला वर्ग आहे, त्यांच्या हिताची जतन करण्याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे. हे करण्याचा पक्ष कुठला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. हा इतिहास निर्माण करायचा आहे, असं शरद पवार म्हणाले.