Sharad Pawar : पुण्यात राजकीय हालचालींना वेग! आधी कडू आता संजय काकडे शरद पवारांच्या भेटीला, नेमकं कारण काय?

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज पुण्यातील त्यांच्या मोदीबाग या निवासस्थानी आहेत. अशातच आज(शनिवारी) सकाळी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू शरद पवारांची भेट घेण्यासाठी मोदी बागेत आले होते.
त्यानंतर आता भाजपचे माजी खासदार संजय काकडे देखील शरद पवारांच्या भेटीसाठी मोदीबाग परिसरात पोहोचले. संजय काकडे यांच्या उपस्थितीने राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आज सकाळीच बच्चू कडू यांनी शरद पवारांची भेट घेतली त्यांच्याशी चर्चा देखील केली. त्यानंतर आता भाजपचे माजी खासदार संजय काकडे देखील शरद पवारांच्या भेटीसाठी मोदीबागेत पोहोचले आहेत. पुण्यातील मोदी बाग या ठिकाणी संजय काकडे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले, त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. Sharad Pawar
आज संजय काकडे यांनी शरद पवारांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी मी माझ्या वैयक्तिक कामासाठी त्यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.
या भेटीत वैयक्तिक कामाबाबत चर्चा झाली आहे. मला माझ्या पक्षांनी याबाबत प्रश्न विचारल्यास मी त्यांना उत्तर देईल असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.