Sharad Mohol murder case : शरद मोहोळ खून प्रकरणात मोठी कारवाई, आणखी एका गुंड पोलिसांच्या हाती, महत्वाची माहिती येणार समोर..

Sharad Mohol murder case : गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील प्रमुख आरोपी गुंड गणेश मारणे याला पुणे पोलिसांनी पाठलाग करत गेल्या आठवड्यात बेड्या ठोकल्या होत्या. आता याप्रकरणात पोलिसांनी आणखी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी सापळा रचून आणखी एका गुंडाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

अभिजीत वरुण मानकर याला पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या. ३१ वर्षीय अभिजीत मानकर हा दत्तवाडी येथील रहिवाशी आहे.
शरद मोहोळ खून प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १६ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ५ जानेवारी रोजी गुंड शरद मोहोळ याला कोथरुडजवळ गोळ्या झाडून खून केला होता. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी वेगानं सुरु केला. आतापर्यंत १७ जणांविरोधात मोक्का लावला आहे, तर आतापर्यंत १६ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. Sharad Mohol murder case

शरद मोहोळ खून प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहे. पोलिसांनी पुरावे शोधण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, आतापर्यंत १५००० ऑडिओ क्लिप हाती लागल्या आहेत. यातील सहा फोन रेकॉर्डमध्ये संशयीत डेटा मिळाला आहे.

एका कॉल रेकॉर्डमध्ये मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांच्यामध्ये संशयित संभाषण होतं. त्याआधारावर दत्तवाडीच्या 31 वर्षीय अभिजीत मानकर याला अटक करण्यात आली आहे. ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी मानकरला बेड्या ठोकल्या. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असून याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.