Sharad Mohol : गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी कारवाई, सर्व आरोपींवर…
Sharad Mohol : गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह १६ आरोपींविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.
शरद मोहोळ हत्याप्रकरणी आरोपींवर मोक्का मअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. शरद मोहोळ हत्या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या १५ आरोपींसह फरार आरोपी गणेश मारणेवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत कारवाई कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलीस रितेश कुमार यांच्याकडून या कारवाईचे आदेश देण्यात आले होते. पुणे पोलिसांनी आता पुण्यातील गुन्हेगारी मोडण्यासाठी कठोर पावले उचलली आहे.
साहील उर्फ मुन्ना पोळेकर (मुख्य आरोपी) ,नामदेव कानगुडे, अमित उर्फ अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गाव्हणकर, विठ्ठल गांदले अॅड. रवींद्र पवार (वकील), अॅड. संजय उडान (वकील), धनंजय मटकर (पिस्तूल पुरवणारा), सतीश शेंडगे (पिस्तूल पुरवणारा), नितीन खैरे, आदित्य गोळे या आरोपींसह एकूण १५ जणांवर मकोका लावण्यात आला आहे.
या कायद्याअंतर्गत एखाद्या गुन्हेगाराला अटकपूर्व जमीन मिळवता येत नाही. ‘मोक्का’ची कारवाई केलेला खटला हा विशेष कोर्टात चालविला जातो. खून, खंडणी, दरोडा यासारख्या तत्सम गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर मकोका लावला जातो. Sharad Mohol
मकोका लावणाऱ्या गुन्हेगारांचा मागील दहा वर्षाचा इतिहास पहिला जातो. त्यात त्याच्यावर दोन किंवा दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्यास ही कारवाई केली जाते.