Sharad Mohol : कसा रचला शरद मोहोळचा हत्याचा कट? अखेर सगळा प्लॅन आला समोर, जाणून घ्या…

Sharad Mohol पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची भररस्त्यातच झालेल्या हत्येने खळबळ उडाली होती. शरद मोहोळच्या हत्येने अख्खं पुणे हादरले होतं. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी पकडले आहे.
मुन्ना पोळेकर हा फक्त मोहरा होता हे समोर आले आहे. कारण हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड रामदास मारणे याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी गुंड विठ्ठल महादेव शेलार आणि रामदास मारणे यांच्यासह १० जणांना ताब्यात घेतले आहे.
पनवेल या ठिकाणाहून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आज दुपारी ३ वाजता या सर्व आरोपींना पुणे सत्र न्यायालयात हजर केले होते. या हत्या प्रकरणात आणखी काही गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.
गुंड विठ्ठल शेलार व रामदास उर्फ वाघ्या मारणेला कोर्टात हजर करण्यात आले. या दोघांविरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात पोलीस अनेक सुत्रधारांचा तपास करत आहेत. शरद मोहोळ याच्या हत्येपूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींची मिटींग झाली होती. त्यामुळे आणखी कोण साथीदार आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत. Sharad Mohol
शरद मोहोळ हत्या प्रकरणात आणखी काही गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. कोर्टात सध्या काही सांगू शकत नाही. त्यामुळे चौकशीसाठी आरोपींची ७ दिवसाची कोठडी मिळावी, अशी मागणी पोलिसांनी केली आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शरद मोहोळ हत्या प्रकरणात दोन मुख्य सुत्रधार होते. यात एक विठ्ठल शेलार आणि त्याचा अजून एक साथिदार आहे. यावरून पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती.
दरम्यान, यावर सुनावणी करत न्यायालयाने शरद मोहोळ हत्या प्रकरणी विठ्ठल शेलार व रामदास उर्फ वाघ्या मारणे या दोघाला २० जानेवारीपर्यत पोलिस कोठडी दिली आहे.