सातारा डॉक्टर प्रकरणात कुटुंबियांचा खळबळजनक दावा ; पीएच्या फोनवरून एक खासदार बोलायचा,अन्…..


सातारा : साताऱ्यातील फलटण शहरात एका महिला डॉक्टरने हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आपल आयुष्य संपवलं असल्याची धक्कादायक घटना समोर आली.या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.याच प्रकरणातील आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेच्या भावाने खळबळ उडवून देणारे आरोप केले आहेत. त्यांनी पीएच्या फोनवरून एक खासदार बोलायचा, रिपोर्ट बदलायलास सांगायचा, असा धक्कादायक दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता आणखीन वेगळे वळण लागणार आहे.

डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येवर तिच्या भावाने प्रतिक्रिया दिले आहे.माझ्या बहिणीच्या आत्महत्येमागे काहीतरी राजकीय दबाव असण्याची शक्यता आहे. कारण माझ्या बहिणीच्या मृत्यू प्रकरणात एफआयआर दाखल करून घेण्यास पोलिसांनी चार ते पाच तास लावले. आता तीन ते साडे तान तास झालेले असले तरी शवविच्छेदनासाठी कोणताही डॉक्टर आलेला नाही,असा आरोप डॉक्टरच्या भावाने केला आहे.तसेच, माझ्या बहिणीने काही अर्ज केले होते. त्या अर्जांची प्रत आम्हाला मिळालेली आहे. त्या तक्रारीत खासदारांच्या पीएच्या फोनवरून खासदार बोलले आणि शवविच्छेदनाचे चुकीचे रिपोर्ट तयार करण्यासाठी दबाव टाकला असा उल्लेख त्याने केला आहे.

दरम्यान डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या तळहातावर एक संदेश लिहिला असून यात तिने एका पोलीस अधिकाऱ्याने चार वेळा बलात्कार केल्याचा तसेच एका पोलीस अधिकाऱ्याने 4 महिन्यांपासून मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचे नमूद केले आहे. या घटनेची दखल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून त्यांनी आरोप असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!