भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन, ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

मुंबई : ज्येष्ठ नेते आणि माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांचे निधन झाले. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. मधुकर पिचड यांची आज प्रकृती खालावली होती. ब्रेन स्ट्रोक आल्याने पिचड यांच्यावर दोन महिन्यांपासून रुग्णालयात सुरू होते.
मधुकर पिचड यांच्या निधनामुळे अकोले तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मुलाच्या इच्छेखातर आपण भाजपमध्ये जात आहोत, असे सांगून मधुकरराव पिचड देखील भाजपमध्ये दाखल झाले होते.
मधुकर पिचड राजकीय कारकिर्दीच्या सुरवातीपासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रवादी स्थापन केली, तेव्हापासून मधुकरराव पिचड त्यांच्याबरोबर होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.. १९९९, २००४, २००९, असे सलग तीनदा राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून आले. यानंतर त्यांनी २०१४ मध्ये त्यांचे पुत्र वैभव पिचड यांना अकोले मतदारसंघात राजकीय वारसदार म्हणून उतरवत विजयी केले.
मधुकर पिचड आणि त्यांचा मुलगा वैभव पिचड यांनी २०१९मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मधुकरराव पिचड यांचे सत्तेतील राजकीय प्रवास प्रदीर्घ, असा राहिलाय. माजी कॅबिनेट मंत्री राहिलेले मधुकरराव पिचड १९८० ते २००९ पर्यंत अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले.
मार्च १९९५ ते जुलै १९९९ या काळात ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. १९८०, १९८५, १९९०, १९९५ या चार पंचवार्षिमध्ये सलग भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून अकोले विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले. या काळात त्यांना आदिवासी, आदिवासी विकास, दुग्धविकास, प्रवास विकास, पशु संवर्धन आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयात काम पाहिले होते.