मोठी बातमी! शाळेचं छत कोसळलं, चार विद्यार्थ्यांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले…


राजस्थान : राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात शुक्रवारी एका सरकारी प्राथमिक शाळेच्या इमारतीचे छत कोसळून किमान चार मुलांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून, ६० हून अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या अपघातामध्ये शाळेची भिंतसुद्धा कोसळली असून, घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पोलीस, अग्निशमन दल, प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थ एकत्र येत विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली असून, मदतकार्य वेगाने सुरू ठेवण्यात येत आहे. शाळेच्या इमारतीची अवस्था अत्यंत जीर्ण होती आणि छताच्या सिमेंटमध्ये पडलेली तडेही अनेक दिवसांपासून लक्ष वेधून घेत होते, असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे.

       

दरम्यान, मागील काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे भिंतींच्या मजबुतीवर परिणाम झाला होता, त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी तात्काळ बचावकार्य सुरु करण्याचे आदेश दिले असून, जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची गंभीरता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या भीषण दुर्घटनेनंतर माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही प्रतिक्रिया दिली असून, झालावाडच्या मनोहरथाना येथील एका शाळेची इमारत कोसळल्याने अनेक विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाल्याची दुःखद माहिती मिळाली आहे. ईश्वरचरणी प्रार्थना करतो की, जीवितहानी कमी व्हावी, असे त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!