Satish Wagh Murder : सतीश वाघ खून प्रकरणी शर्मा, गुरसाळे, शिंदे, जावळकरला २० डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी, महत्वाची माहिती येणार समोर…

Satish Wagh Murder : आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचे अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. मामा सतीश वाघ यांचा खून झाला असून यवत गावच्या हद्दीत मृतदेह सापडला होता.

या हत्याप्रकरणी पवन शर्मा (वय.३०), नवनाथ गुरसाळे (वय. ३१), विक्की शिंदे (वय. २८) आणि सोन्या जावळकर (वय. २९) यांना न्यायालयाने २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. भाडेकरूनेच पाच लाख रुपयांची सुपारी देवून खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
याप्रकरणात, हडपसर पोलिसांनी चौघांना अटक करत गुरूवारी (ता.१२) वानवडी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले. यावेळी, न्यायालयाने त्यांना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर पोलीस अतिश जाधव या आरोपीचा शोध घेत आहेत.

वाघ हे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत. त्यांचे अपहरण करून त्यानंतर चाकूने त्यांचा खून करून मृतदेह उरूळी कांचन परिसरात शिंदवणे घाटामध्ये फेकून दिला होता.
या प्रकरणी मुलगा ओंकार वाघ यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी जवळकर हा पूर्वी सतीश वाघ यांच्याकडे खोलीत भाडेकरू म्हणून राहत होता. त्यांच्यात वाद झाल्यामुळे अक्षयने खोली सोडली होती.
या कारणावरून अक्षयने चार-पाच महिन्यांपूर्वी आरोपी पवनला वाघ यांचा खून करण्यासाठी पाच लाखांची सुपारी दिली होती. पवनने त्याचे साथीदार नवनाथ गुरसाळे, विकास शिंदे यांनी संगनमताने खुनाचा कट रचला आहे. Satish Wagh Murder
दरम्यान, आरोपी यांनी केलेले कृत्य हे घृणास्पद व मानवी जीविताला काळिमा फासणारे आहे. गुन्ह्यात वापरलेली हत्यारे आरोपीकडून जप्त करावयाचे आहेत. या गुन्ह्यातील आरोपीवर कलम अपहरण करून खून केल्याचे कलम वाढविण्यात आले होते.
तसेच चारही आरोपींचे मोबाईल तपासासाठी जप्त करण्यात आले आहेत, असे तपास अधिकारी असलेले अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी न्यायालयास सांगितले आहे.
