सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण ; पोलीस अधीक्षकांनी दिली महत्त्वाची माहिती, पीडितेचा मोबाईल अन डायरी…..

सातारा : साताऱ्याच्या फलटणमध्ये महिला डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्याच्या अगोदर त्यांनी एक नोट हातावर लिहित सर्वांनाच मोठा धक्का दिला.संपदा यांनी आत्महत्या केली असली तरीही असंख्य प्रश्न निर्माण झाले असून दररोज या प्रकरणात धक्कदायक खुलासे होत आहे.आता त्यावर साताऱ्याचे पोलिस अधिक्षक तुषार दोषी यांनी माहिती दिली आहे.महिला डॉक्टरच्या मोबाईलमधील कोणतीही पुरावे डिलीट करण्यात आली नाहीत. यासोबतच महिला डॉक्टरची कोणतीही डायरी पोलिसांना सापडली नसल्याचेही त्यांनी म्हटल आहे.

पुढे बोलताना तुषार दोषी म्हणाले की, पीडित महिलेचा मोबाईलची तपासणी सुरू आहे. तिथे ज्याकाही गोष्टी मिळाल्या त्याची तपासणी केली जात असून पुरावे गोळ्या केली जात आहेत.पण वैयक्तीक डायरी, नोंदी किंवा कोणत्याही प्रकारची दैनंदिनी अशी कोणतीही गोष्ट मिळालेली नाही, असे स्पष्टपणे पोलिस अधिक्षक तुषार दोषी यांनी म्हटले आहे. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर विविध गंभीर आरोप केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या प्रकरणात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. या प्रकरणातील दोन्ही आरोपी पोलिस कोठडीत आहेत.

फलटण येथील उपजिल्हा रूग्णालयात संपदा मुंडे वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत होत्या. याशिवाय त्या पुढील शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेऊन अभ्यासही करत होत्या. संपदा मुंडे यांच्या घरची परिस्थिती हालाखीची होती. त्यांच्या आई वडिलांनी मोठी कष्ट करून संपदा यांना डॉक्टर बनवले. संपदा या अत्यंत मेहनती होत्या, एकाही रूग्णाने कधी डॉक्टर महिलेची साधी तक्रारही केली नाही. मात्र, अचानक संपदा मुंडे यांनी हातावर एक नोट लिहित आत्महत्या केली. पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांची नाव हातावर लिहित संपदा यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.

