सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण ; प्रशांत अन डॉक्टर तरुणीचे संबंध, Whatsapp Chat मधून पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती…

सातारा : सातारा जिल्ह्यातील तरुण महिला डॉक्टर संपदा मुंडेच्या आत्महत्येप्रकरणी धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी प्रशांत बनकर याला अटक केली आहे. त्यानंतर आता सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी महत्वाची माहिती दिली आहे. पीडित डॉक्टर तरूणी आणि प्रशांत बनकर या दोघांमध्ये संबंध होते, अशी माहिती त्यांनी दिली आहे. या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

साताऱ्यातील फलटण येथील डॉक्टर तरूणी संपदा मुंडे हिने आपलं आयुष्य संपवलं. गुरूवारी हॉटेलमध्ये आयुष्याचा दोर कापला. या प्रकरणी डॉक्टर तरूणीनं हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटवरून पोलिसांचा तपास सुरू आहे. तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये डॉक्टर तरूणीने पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. आरोपानुसार, पोलिसांनी प्रशांत बनकरला पहाटे पुण्यातील फार्महाऊसवरून ताब्यात घेतलं. आरोपी प्रशांत बनकरला ताब्यात घेतल्यानंतर सातारा पोलीस अधिक्षक तुषार दोषी यांनी पीडित डॉक्टर तरूणी आणि प्रशांत बनकर यांच्यात संबंध होते. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाले. चॅटिंगमधून बनकर आणि डॉक्टर तरूणी यांच्यात संबंध होते हे निष्पन्न झालं आहे’, अशी माहिती दिली आहे. त्यामुळे साताऱ्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान ‘या प्रकरणी पीएसआय गोपाल बदने यांचा काय सहभाग आहे? पीडित डॉक्टर तरूणी आणि पीएसआयचे काय संबंध होते का? याचा तपास सुरू आहे’, अशी माहिती तुषार दोषी यांनी दिली आहे. तसेच प्रशांत घर मालक आहेत. बनकर सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, तो पुण्यात राहत होता. तर, डॉक्टर तरूणी मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत होती अशीही माहिती त्यांनी दिली आहे. या प्रकरणाची आणखी काही माहिती मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

