Salman Khan : सलमान खान गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट, नदीत सापडल्या बंदुका, मुंबई क्राईम ब्रँचला मोठं यश…


Salman Khan : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी गोळीबार केला. या घटनेनंतर मनोरंजन सुष्टी हादरली आहे. गोळीबार करणाऱ्यांच सीसीटिव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

आता पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं असून सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना गुजरातमधील भुज येथून अटक करण्यात आली आहे.

तसेच मुंबई क्राईम ब्रँच सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या तपासात व्यस्त आहे. आता मोठे यश मिळवत गुन्हे शाखेने गुजरातमधील सुरत येथील तापी नदीतून घटनेत आरोपींनी वापरलेली दुसरी बंदूकही जप्त केली आहे.

बंदुकीसोबतच पोलिसांना तीन मॅगझिनही सापडल्या आहेत. अखेर दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर गुन्हे शाखेने गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही बंदुका जप्त केल्या आहेत. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या नेमबाजांना १० राऊंड गोळीबार करण्याचे आदेश देण्यात आले होते. Salman Khan

तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, संशयितांनी चौकशीदरम्यान सांगितले की, घटनेनंतर त्यांनी बंदुक सुरतच्या तापी नदीत फेकली होती. मुंबई क्राईम ब्रँचने सांगितले की, आरोपी विक्की गुप्ता याला सुरत तापी नदीवर नेण्यात आले, तिथे त्याने बंदूक फेकली. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिकच तपासही करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!