Rohit Pawar : डंपर दुर्घटनेनंतर रोहित पवारांचा सरकारवर निशाणा, म्हणाले, तर हा अपघात…

Rohit Pawar पुणे जिल्ह्यात मध्यरात्री एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावतीवरून कामासाठी पुण्यात आलेल्या ९ जणांना पुण्यात वाघोली केसनंद परिसरात डंपरने चिरडलं. यामुळे एकच खळबळ उडाली. याबाबत सध्या पोलीस तपास करत असून या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे.

या अपघातामुळे राज्यभरातील हळहळ व्यक्त होत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार, रोहित वार यांनीही दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्क केलं आहे. X या सोशल मीडिया साईटवर एक पोस्ट लिहून त्यांनी त्यांचा उद्वेगही व्यक्त केला आहे. Rohit Pawar
‘ज्या रोजगारासाठी हे कामगार पुण्यात आले होते तो रोजगार त्यांना अमरावतीतच उपलब्ध झाला असता तर कदाचित आजची ही दुर्घटना घडली नसती. मायबाप सरकार याची दखल घेणार की नाही? असा सवालही रोहित पवार यांनी विचारला आहे.

काय आहे रोहित पवार यांच्या पोस्टमध्ये?
तुम्ही गरीब असाल, तुमच्या डोक्यावर छत नसेल आणि धरती हे अंथरूण तर आकाश हेच पांघरूण असेल तर तुम्ही किड्या मुंग्यासारखे चिरडून मेलात तरीही त्याचं कुणालाच काहीच देणंघेणं नाही.. असे वाटण्याची परिस्थिती म्हणजे, वाघोली केसनंद इथं पोटाची खळगी भरण्यासाठी अमरावतीहून आलेल्या आणि दमून भागून रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कामगारांना काळ बनून आलेल्या मद्यधुंद डंपर चालकाने अक्षरशः चिरडले.

यात दोन चिमुकल्यांसह तिघांनी उपाशीपोटीच जगाचा निरोप घेतला तर अजूनही सहाजणांची मृत्यूशी झुंज सुरुय.. अंगावर काटा आणणाऱ्या या घटना का थांबत नाहीत? की गरिबांना जगण्याचा अधिकारच नाही का? सकाळी सकाळी ही बातमी पाहून मन सुन्न झालं.. ज्या रोजगारासाठी हे कामगार पुण्यात आले होते तो रोजगार त्यांना अमरावतीतच उपलब्ध झाला असता तर कदाचित आजची ही दुर्घटना घडली नसती. मायबाप सरकार याची दखल घेणार की नाही?
यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जखमी झालेले कामगार लवकर बरे व्हावेत, ही प्रार्थना! सरकारने पिडीत कुटुंबांना योग्य भरपाई द्यावी ही विनंती.
असे रोहित पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहीत सरकारला सवाल केले आहेत, तसेच भरपाई देण्याची विनंतीही केली आहे.
रोहित पवार यांनी केलेली पोस्ट…
तुम्ही गरीब असाल, तुमच्या डोक्यावर छत नसेल आणि धरती हे अंथरूण तर आकाश हेच पांघरूण असेल तर तुम्ही किड्या मुंग्यासारखे चिरडून मेलात तरीही त्याचं कुणालाच काहीच देणंघेणं नाही.. असं वाटण्याची परिस्थिती म्हणजे वाघोली केसनंद इथं पोटाची खळगी भरण्यासाठी अमरावतीहून आलेल्या आणि दमून भागून…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 23, 2024