Rohit Pawar : सुप्रिया सुळे यांच्या विजयी सभेत आमदार रोहित पवार गरजले, थेट म्हणाले, अजितदादांना सांगा मी आता बच्चा नाही…

Rohit Pawar : बारामती लोकसभा मतदार संघात पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला होता. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. प्रतिष्ठेच्या या लढाईत संपूर्ण पवार कुटुंब सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी उभे राहिले. तर एकटं पाडल्याचा दावा करत अजित पवारांनी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, मतदारांनी सुप्रिया सुळे यांच्या बाजूने मतदान केले. या निवडणुकीत सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला.
अजित पवार यांनी रोहित पवार यांच्यावर केली टीका…
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकी दरम्यान प्रचार करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवार यांच्यावर टीका करताना तो बच्चा असल्याचे मत व्यक्त केले होते.
तोच धागा पकडून आमदार रोहित पवार देखील प्रत्येक सभांमध्ये मी बच्चा आहे, पण मनका सच्चा आहे असे सांगत काका अजित पवारांवर टीका करत होते. बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाली, मतमोजणी झाली, प्रचारादरम्यान रोहित पवार यांनी प्रचंड कष्ट घेतले. Rohit Pawar
सगळी यंत्रणा उभारण्यापासून ते एका दिवशी २४- २४ सभा देखील त्यांनी घेतल्या. बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करत सुप्रिया सुळे यांना दीड लाखाहून अधिक मतांनी विजयी केले.
मी बच्चा राहिलेलो नाही…
त्यानंतर आज आमदार रोहित पवार बारामतीत आले. बारामतीत आल्यानंतर पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले. प्रश्नाच्या ओघात अजित दादांच्या बच्चा असल्याचा उल्लेख रोहित पवारांनी केला आणि तेवढ्यात तो शब्द सावरून, त्यांनी आता मी बच्चा राहिलेलो नाही असे मिश्किलपणे सांगितले आहे.