Rohit Pawar : रोहित पवारांचा झंझावात सुरू! पहाटे श्रीक्षेत्र तुळापूर येथे शंभू महादेवाला घातलं साकडं…


Rohit Pawar तुळापूर : युवकांचे विविध प्रश्न हाती घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली युवा संघर्ष यात्रेला सुरूवात झाली आहे. युवा संघर्ष यात्रेचा शुभारंभ रोहित पवार यांनी महात्मा फुले वाडा, लाल महाल येथे अभिवादन करून युवा संघर्ष यात्रेला सुरूवात केली. Rohit Pawar

यावेळी लाल महाल ते टिळक स्मारकपर्यंत पायी यात्रा काढण्यात आली. तिथं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. यावेळी रोहित पवार Rohit Pawar यांचे कुटुंब देखील उपस्थित होते. उद्यापासून आता आज प्रामुख्याने तुळापूर येथून या पायी यात्रेला सुरूवात झाली आहे.

यावेळी श्रीक्षेत्र तुळापूर येथे शंभू महादेवाला त्यांनी साकडं घातलं आहे. एकूण ८०० किलोमीटर आणि ४२ दिवस अशी ही पदयात्रा असणार आहे. पवार कुटुंबात पहिल्यांदा आमदार रोहित पवार हे सहकुटुंब पदयात्रेत दिवाळी साजरी करणार आहेत.

रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार आणि पत्नी कुंती पवार या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, सरकार आता त्यांच्या प्रश्नाबाबत काय भूमिका घेणार हे लवकरच समजेल.

आमदार रोहित पवार यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित असणार आहेत. अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे अनेकांचे लक्ष या यात्रेकडे असणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!