नितेश राणे हाय हाय!! तृतीयपंथीयांचा ‘त्या’ शब्दावरून राणे यांच्या विरोधात पुण्यात रस्तारोको..

पुणे : आमदार नितेश राणे यांच्या विरोधात तक्रार नोंदवायला पुणे पोलिसांनी नकार दिल्याचा आराेप करीत आज बुधवार (ता.१२) तृतीयपंथी यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनच्यासमोर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता राेकाे आंदोलन छेडले. या आंदाेलनातील काही आंदाेलकांना पाेलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी उद्धव ठाकरेंवर टीका करताना हिजड्यांचा प्रमुख उद्धव ठाकरे आहे असे म्हटले हाेते. सगळी सरकारी यंत्रणा बाजूला ठेव मग बघू. आमच्या नेत्यांवर टीका बंद नाही केली तर तुझे कपडे टरा टरा फाडणार असा इशारा देखील राणेंनी दिला.
दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तृतीयपंथी समाजाचा अवमान केल्याची तक्रार पोलीस घेत नाहीत असे सांगत तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन छेडले. बंडगार्डन पोलीस स्टेशनच्यासमोर आंबेडकर चौकात हे बेमुदत रास्ताे राेकाे आंदोलन करण्यात येत आहे.
परंतु तृतीयपंथी यांनी आंदोलनावर ठाम भूमिका घेतली. दरम्यान काही आंदाेलनकर्त्यांनी पाेलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी काहींनी त्यास प्रतिकार केला परंतु पाेलिसांनी बळाचा वापर करुन आंदाेलकांना पाेलिस ठाण्यात नेले.