इंदापूर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक महिलेला लाच घेताना अटक, शेतकऱ्याकडे मागितली होती २५ हजाराची लाच..


इंदापूर : इंदापूर तहसिल कार्यालय येथे महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या महिलेला शेतकऱ्यातून २५ हजार रुपयांची घेतल्याप्रकणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.

जमिनीतून रस्ता करण्यासाठी परवानगी मिळावी, याच्या अंतिम आदेशावर तहसिलदार यांची सही घेण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच घेताना इंदापूर तहसील कार्यालयातील महसूल सहायक महिलेला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.

कावेरी विजय खाडे (वय ४८) असे अटक केलेल्या महसूल सहायक महिलेचे नाव आहे.

नेमकं घडलं काय?

इंदापूर परिसरातील मौजे भांडगाव येथे तक्रारदारांच्या वडिलांची ३९ गुंठे जमीन आहे. जमिनीच्या परिसरात रस्ता तयार करण्यासाठी परवानागी मिळावी, असा अर्ज तक्रारदाराने इंदापूर तहसील कार्यालयात अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी झाली.

अंतिम आदेशावर तहसीलदारांची सही घेण्यासाठी तहसील कार्यालयातील महसूल सहायक खाडे हिने तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

या तक्रारीची पडताळणी केल्यावर कावेरी खाडे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी इंदापूर तहसील कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून २५ हजार रुपये घेताना कावेरी खाडे हिला पकडण्यात आले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!