रिझर्व बँकेच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा ; रेपो दर स्थिरच, कर्ज महागणार नाहीत..


पुणे : गेल्या काही दिवसांपासून आरबीआयने पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये कपात करून सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अशातच आता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी मौद्रिक धोरण जाहीर केले. या जाहीर केलेल्या द्वैमासिक मौद्रिक धोरणात कर्जदारांना दिलासा मिळाला आहे.या मौद्रिक धोरण समितीने रेपो रेट तसाच कायम ठेवला आहे. रेपो दर 5.5 टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असणाऱ्या पतधोरण बैठकीत आज रेपो रेट कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या एका वर्षात रेपो रेटमध्ये आरबीआयने तब्बल तीन वेळा मोठी कपात केली आहे.रेपो रेट हा एमपीसीमधील सर्व सदस्यांच्या संमतीने ठरविण्यात आला आहे. आता या निर्णयामुळे होम लोन, वैयक्तिक लोन, कार लोनवरील व्याजदरात कोणताही बदल होणार नाही.

दरम्यान आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, समितीचे सर्व सदस्य व्याजदर स्थिर ठेवण्याच्या बाजूने होते. त्यामुळे जीएसटी कपातीनंतर महागाईत घट झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!