मोठी बातमी! मराठा एसईबीसी कोट्यानुसारच आरक्षण, ठरला आकडा..

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला असून, राज्य सरकारने येत्या २० तारखेला एकदिवसीय अधिवेशन घेणार असल्याचं सांगितलं होतं. मराठा आरक्षणसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे.

मराठा आरक्षणाचा शब्द देत मुख्यमंत्र्यांनी तोंडाला पानं पुसल्याची टीका विरोधी पक्षातून होऊ लागली आहे. अशातच मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा मसुदा तयार केल्याची माहिती समजत आहे.
मराठा आरक्षणाचा मसुदा तयार झाला असून हा मसुदा तयार करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींची घेण्यात आली होती. कोर्टात नवा कायदा टिकेल असं तज्ञांचं मत आहे. महाराष्ट्रामध्ये कुणबी वगळून आता ३२ टक्के मराठा समाज असल्याचं अहवालात म्हटलं गेलं आहे. त्यामुळे मराठा समाजाला १३ टक्के आरक्षण मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

दरम्यान, मागे सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण फेटाळताना ज्या त्रुटी आणि निरीक्षण सांगितली होतीत त्या नवीन कायद्यामध्ये दूर केल्या गेल्या आहेत. नवीन कायदा कोर्टात टिकेल याचीसुद्धा तयारी सरकारने केली आहे.
