रेल्वे प्रवाशांना दिलासा! महाराष्ट्रातील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला ‘या’ स्टेशनवर मिळाला अतिरिक्त थांबा..


मुंबई : वंदे भारत ही हाय स्पीड ट्रेन सध्या अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. आपल्या राज्याला आत्तापर्यंत अकरा वंदे भारत ट्रेन मिळालेल्या आहेत. राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते मडगाव, सीएसएमटी ते जालना, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी, नागपूर ते सिकंदराबाद, नागपूर ते इंदोर आणि नागपूर ते बिलासपुर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.

आता राज्यातील वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत ट्रेन मुंबई सेंट्रल ते गांधीनगर या गाडीला एक अतिरिक्त थांबा मंजूर करण्यात आला आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही गाडी गुजरात राज्यातील आनंद रेल्वे स्थानकावर थांबा घेत असून याबाबत रेल्वे बोर्डाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

अत्यंत कमी काळात वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ही गाडी आधी मुंबई सेंट्रल, बोरिवली, वापी, सुरत, वडोदरा, अहमदाबाद, गांधीनगर याच रेल्वे स्थानकावर थांबा घेत होती. पहिली वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन म्हणून ओळखली जाणारी मुंबई सेंट्रल – गांधीनगर वंदे भारत ट्रेन कमी काळात प्रवाशांमध्ये लोकप्रिय ठरली.

दरम्यान, गाडी क्रमांक 20901 मुंबई सेंट्रल – गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक 20902 गांधीनगर – मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेसला 23 मार्च 2025 पासून प्रायोगिक तत्वावर आनंद स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. आता गाडी क्रमांक 20901 मुंबई सेंट्रल – गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी 10.38 वाजता आनंद स्थानकात पोहचते.

त्यानंतर सकाळी 10.40 वाजता निघते. मात्र इतर स्थानकाच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच गाडी क्रमांक 20902 गांधीनगर – मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेस आनंद स्थानकावर दुपारी साडे तीन वाजता पोहोचते आणि दुपारी 3 वाजून 32 मिनिटांनी निघते.

दरम्यान, प्रवाशांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता आता या वंदे भारतला पश्चिम रेल्वेवरील गुजरातमधील आनंद स्थानकावर प्रायोगिक तत्वावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे या गाडीच्या वेळापत्रकात सुद्धा बदल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती रेल्वे बोर्डाकडून देण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!