भोंदू मनोहर मामाला दिलासा; पोलीस कोठडी नाकारली, तपास सुरू


सोलापूर : भोंदूगिरी आणि आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या मनोहर मामा भोसले याला माढा न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्याची पोलीस कोठडी नाकारत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. त्याच्यासोबत विशाल वाघमारे आणि नरेंद्र सांगळे यांनाही दिलासा मिळाला आहे.

मात्र, अडचणी इथेच थांबलेल्या नाहीत. करमाळा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुसऱ्या गुन्ह्यात पोलीस न्यायालयाची परवानगी घेऊन पुन्हा ताबा घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, सरकारी पक्षाने या प्रकरणात संघटित गुन्हेगारीची कलमे लावल्याने भोसलेला जामिनासाठी बार्शी सत्र न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागणार आहे.

भोसलेचा करमाळा तालुक्यातील घोटी येथे तब्बल 27 एकरांवर पसरलेला आलिशान आश्रम चर्चेत आला आहे. अमावस्येला येथे मोठी गर्दी होत असे आणि बाबाला भेटण्यासाठी 11 हजार रुपये घेतले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

लासुर्णे गावचा मूळ रहिवासी असलेला भोसले सुरुवातीला साधा व्यवसाय करत होता. मात्र अचानक गायब झाल्यानंतर “बाळूमामांचा आशीर्वाद आहे” असा दावा करत त्याने भोंदूगिरीचा धंदा सुरू केला.

याआधीही त्याच्यावर महिलेवरील अत्याचार, कर्करोग आणि मणक्याचे आजार बरे करण्याच्या नावाखाली फसवणुकीचे गुन्हे नोंद आहेत. 2021 पासून गुन्हे दाखल असूनही त्याची भोंदूगिरी सुरूच होती.

या सर्व प्रकारामुळे परिसरात संताप उसळला असून कठोर कारवाईची मागणी होत आहे. आता पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!