शेतकऱ्यांना मोठा दिलासा!! मिळणार हेक्टरी 47 हजारांची मदत, राज्य सरकारची मोठी घोषणा…


मुंबई : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मदतीसाठी मोठी घोषणा केली. राज्यात जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. या संदर्भात अधिकृत शासन निर्णय देखील प्रकाशित करण्यात आला आहे.

शेतीच्या जमिनी वाहून जाणे, पिके उध्वस्त होणे आणि आर्थिक परिस्थिती कोलमडल्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली होती. यामध्ये नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागांतील एकूण 23,065 शेतकऱ्यांसाठी 29 कोटी 25 लाख 61 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना आता यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी त्यांना अपेक्षेपेक्षा कमी मदत मिळत आहे, असं काही शेतकऱ्यांनी म्हटले आहे. काही शेतकरी सरकारच्या निकषांत बसत नसल्याने त्यांना कोणतीही मदत मिळत नाही. काहींना समाधानकारक भरपाई मिळत नाही, तर काही शेतकरी या योजनेपासून वंचित राहतात.

यामध्ये अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंतच्या शेतीसाठी प्रति हेक्टरी 47 हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. मात्र ही मदत 5 हजार रुपयांपेक्षा कमी असणार नाही. असेही सांगितले गेले आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर विचार करता त्यांना मदतीची तातडीने गरज आहे. अनेक शेतकरी अजूनही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत, यामुळे लवकरात लवकर मदत मिळणार का? असा प्रश्न त्यांचा आहे. अनेक शेतकऱ्यांना योजनेच्या निकषांमुळे मदत मिळू शकलेली नाही. यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 7 कोटी 65 लाख 18 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांना 1 कोटी 48 लाख 89 हजार रुपये, नागपूर जिल्ह्यातील 1 कोटी 42 लाख 74 हजार रुपये, पुणे जिल्ह्यात 36 लाख 85 हजार रुपये, सातारा जिल्ह्यात 20 लाख 35 हजार रुपये, जळगाव जिल्ह्यात 13 लाख 1 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

तसेच सांगलीत 82 हजार रुपये, गडचिरोली जिल्ह्यात 11 लाख 55 हजार रुपये, तसेच अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि इतर जिल्ह्यांमध्येही निधी वितरीत केला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात तरी दिलासा मिळाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!