घरात लपवून रजिस्टर्ड मॅरेज, ५ वर्षांनी तरुणीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्यास नकार, पुण्यातील पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल..

पुणे : फसवणुकीच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. अशातच पुण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने एका तरुणीसोबत नोंदणी पद्धतीने विवाह केला.त्यानंतर पाच वर्षांनी तिचा पत्नी म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आहे.
पोलिस उपनिरीक्षकावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुणी अनुसूचित जातीची असल्याने त्याने नकार दिला; तसेच तरुणीला गर्भपात करण्यास भाग पाडले आणि तरुणीकडून दहा ते १२ लाख रुपये घेऊन परत केलेले नाहीत, असे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी एका २८ वर्षाच्या तरुणीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली. फलटण येथील गोखली गावातील ३२ वर्षीय तरुणासह त्याचा भाऊ आणि वडील यांच्यावर या प्रकरणी अट्रॉसिटी कायद्यांसह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ३० सप्टेंबर २०२० ते २०२५ या काळात झाला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, पुण्यात पोलीस उपनिरीक्षकपदी नुकतीच नियुक्ती झालेल्या तरुणाने २८ वर्षीय तरुणीशी नोंदणी पद्धतीने लग्न केले.मात्र, त्याबद्दल त्याने कुटुंबीय आणि मित्र परिवारात सांगितले नाही; तसेच तिला समाजात पत्नी म्हणून ओळख दिली नाही.
लग्नाबद्दल घरी सांगतो,’ असा विश्वास दाखवून त्याने तरुणीकडून वेळोवेळी १० ते १२ लाख रुपये घेतले. तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ती गर्भवती राहिली. तेव्हा आरोपीने जबरदस्तीने तिला गर्भपात करायला लावला.तरुणीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्यास नकार देणाऱ्या या पोलिस उपनिरीक्षकावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, एका २८ वर्षाच्या तरुणीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली. फलटण येथील गोखली गावातील ३२ वर्षीय तरुणासह त्याचा भाऊ आणि वडील यांच्यावर या प्रकरणी अट्रॉसिटी कायद्यांसह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.