RBI : आरबीआयने सिबिल स्कोरच्या नियमात केला मोठा बदल, लगेच जाणून घ्या नाहीतर होऊ शकते नुकसान…

RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सिबील स्कोरच्या नियांमध्ये बदल केले आहेत. आता नवीन नियमानुसार, ग्राहकांचा सिबील स्कोर प्रत्येक १५ दिवसानंतर अपडेट केला जाणार आहे. त्यामुळं ग्राहकांना त्यांचा सिबील स्कोर चांगला ठेवावा लागणार आहे. आता हा नवीन नियम १ जानेवारी २०२५ पासून लागू केला जाणार आहे.
तुम्हला या नवीन सिबील स्कोरच्या संदर्भात माहिती असणं गरजेचे आहे. तुमचा जर सिबील स्कोर खराब असेल तर तुम्हाला पुढच्या वेळी कर्ज मिळवण्यासाठी बँकांमध्ये फेऱ्या माराव्या लागतील. जे लोक वेळेवर कर्जाची परतफेड करणार नाहीत, त्यांना हा फटका बसणार आहे.
दर १५ दिवसानंतर ग्राहकांचा सिबील स्कोर अपडेट केला जाणार आहे. त्यामुळे वित्तीय संस्थांनी लवकरात लवकर क्रेडीट स्कोअर अपडेट करावा असे आरबीआयने म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सिबील स्कोर हा दर महिन्याच्या १५ तारखेला आणि महिन्याच्या शेवटी अपडेट केला जाऊ शकतो. क्रेडिट संस्था आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या त्यांच्या इच्छेनुसार देखील तारखा निश्चित करु शकतात. RBI
ज्या अंतर्गत डेटा अपडेट केला जाऊ शकतो. क्रेडिट संस्थांनी ग्राहकांची क्रेडिट माहिती दर महिन्याला सीआयसी यांच्याकडे सबमिट करणं आवश्यक आहे. दरम्यान, या निर्णयाचा बँक आणि ग्राहक या दोघांनांदी फायदा होणार आहे. बँक आणि एनबीएफसी या दोन्हींसाठी देखील क्रेडिट माहिती खूप महत्वाची आहे.
याद्वारे ते कोणाला कर्ज द्यायचे आणि कोणाला देऊ नये याबद्दल अधिक चांगला निर्णय घेऊ शकतात. यामुळे कर्जावर आकारण्यात येणारा व्याजदर ठरवण्यात देखील मदत होणार आहे. चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना कमी दरात कर्ज मिळू शकतो.