Ratan Tata : रतन टाटांना रुग्णालयात दाखल, प्रकृतीबाबत महत्वाची माहिती आली समोर…

Ratan Tata : देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णलयात उपचार केले जात आहेत. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष असलेल्या रतन टाटा यांचे वय ८६ वर्षे इतके आहे. रात्री त्यांना रुग्णालयात आणलं आहे. त्यांचा रक्तदाब खूपच कमी झाला होता अशी माहिती समजते.
मात्र आता खुद्द रतन टाटा यांनीच त्यांच्या या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. वयोमान लक्षात घेता माझ्या वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत, काळजी करण्यासारखं काहीही नाही, असं रतन टाटा यांनी सांगितले आहे. रात्री उशिरा त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे म्हटले जात होते सध्या ब्रीच कँडी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार रतन टाटा यांना यांच्यावर हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शाहरुख असपी गोळवाला यांच्या निरीक्षणाखाली चाचण्या केल्या जात आहेत. डॉ. शाहरुख हे एक विख्यात डॉक्टर आहेत. रतन टाटा यांना रात्री उशिरा १२.३० ते १ वाजेच्या दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Ratan Tata


दरम्यान, वयोमानानुसार नियमित वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात आणलं होतं असं सांगण्यात येत आहे. काळजी करण्याचं काही कारण नसल्याचं म्हटलं आहे. रतन टाटा यांच्या प्रकृतीबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रतन टाटा यांना रात्री साडे बाराच्या सुमारास तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर शारुख एस्पी गोलवाला यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.