नराधमाने बालपणीच्या मैत्रीचा घेतला फायदा, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत केला बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना..
पुणे : लहानपणापासून मित्र असलेल्या एकाने मैत्रीचा गैरफायदा घेतला. दोघांचे एकत्र असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना चंदन नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
याप्रकरणी पीडित तरुणीने चंदन नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी आसिफ रहीम शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी लहानपणापासूनचे मित्र आहेत. त्या दोघांचे एकत्र असलेले साधे फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी आरोपीने पीडितेला दिली. त्यानंतर तुझ्या मामाला ठार मारेल अशी धमकी देऊन फिर्यादी सोबत जबरदस्तीने शरीर संबंध केले.
यानंतर पीडित तरुणीने चंदन नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.