Rally Campaign : मोठी बातमी! राज्यात राजकीय वातावरण पेटलं, भाजपच्या प्रचार रॅलीवर दगडफेक, नेमकं काय घडलं?


Rally Campaign : सध्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. महायुतीचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या रॅलीवर दगडफेक झाली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. देवनार गौतमनगर परिसरात रॅली दरम्यान हा प्रकार घडला आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

याप्रकरणी देवनार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर शाब्दिक वार करतात. पण अशातच आता दगडफेकीची घटना घडली आहे. यामुळे राजकीय वातावरण कुठपर्यंत गेलं आहे ते यावरून दिसून येते.

लोकसभा निवडणुकीमध्ये ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्यात लढत होणार आहे. याठिकाणी काटे की टक्कर असल्याचे दिसून येत आहे. यामुळे विजय नेमकं कोणाचा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याठिकाणी कार्यकर्ते आक्रमक आहेत. निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत सर्वच पक्ष जोरात प्रचार करत आहेत. अशातच मिहिर कोटेचा यांच्या रॅलीवर दगडफेक झाली. यामुळे हा वाद विकोप्याला जाण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळात याबाबत अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. Rally Campaign

या घटनेमुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक बडे नेते सभा घेत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. मोदींच्या सभा देखील सुरू आहेत.

राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहे. नेत्यांच्या गाठीभेटी देखील वाढल्या आहेत. अनेक नेते पक्षांतर करत असल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळे निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!