Raj Thackeray : शरद पवारांनी राज्यात जातीपातीच विष कालवले, पण अजित पवारांनी….! राज ठाकरे यांचे पुण्यातील सभेत मोठं वक्तव्य

Raj Thackeray : लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यात १३ मे ला मतदान होणार आहे. पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी पुणे शहराच्या विकासाबाबत बोलताना जातीपातीच्या राजकारणावरूना शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

राज ठाकरे म्हणाले, शरद पवारांनी १९९९ साली राष्ट्रवादीची स्थापना केली आणि राज्यात जातीयतेचे राजकारण सुरू झालं. राम गणेश गडकरींच्या पुतळ्यावरून राजकारण झाले. भांडारकर आणि जेम्स लेनच्या मुद्द्यावरून राजकारण झालं. पण राष्ट्रवादीतील अजित पवार या माणसाने कधीही जातीचं राजकारण केलं नाही. शरद पवारांसोबत राहूनही त्यांनी जातीचे राजकारण केले नाही.
शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यापासून महाराष्ट्रात जातीपातीचे विष कालवले गेले असा आरोप राज ठाकर यांनी केला आहे. तसेच पुण्यात राम गणेश गडकरींचा पुतळा हटवण्यात आला. अनेकांना तेव्हा वाटलं होतं नितीन गडकरींचे ते नातेवाईक आहेत, म्हणून त्यांचा पुतळा हटवला. Raj Thackeray

राम गणेश गडकरी कोण आहेत ते तरी माहीत आहे का? मात्र या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या आहेत. जेम्स लेनने सांगितलं होतं की मी कुठल्याही माणसाला महाराष्ट्रात भेटलो नाही. त्याआधी विष कालवून झालं होतं. असाही आरोप राज ठाकरेंनी केला आहे.

राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील काही नेते आज जनतेला जातीपातीच्या राजकारणात गुंतवून ठेवत आहेत. पण, याबाबतीत अजित पवार यांना मानलं पाहिजे. अजित पवार यांच्याशी माझे अनेक मतभेद असतील. पण या माणसाने कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही.
मी त्यांना अनेक वर्षांपासून बघतोय. इतके वर्ष ते शरद पवार यांच्याबरोबर राहिले. मात्र, ते कधी जातीपातीचं राजकारणात पडल्याचं मी बघितलं नाही, असं विधान राज ठाकरे यांनी यांनी यावेळी केले आहे.