सोनं-चांदी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! सोन्याच्या भावात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

मुंबई : सोने-चांदी खरेदीदारांना मोठा दिलासा! गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या सोन्या-चांदीच्या दरांमध्ये अखेर मोठी घसरण झाली आहे. जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू असलेल्या दरवाढीनंतर आज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विशेष म्हणजे, 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅम (1 तोळा) दरात तब्बल 1,850 रुपयांची घसरण झाली असून, 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅम दरात 1,700 रुपयांनी घट झाली आहे. तसेच चांदीच्या दरातही 500 रुपयांची घसरण झाल्याने गुंतवणूकदार आणि दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे.

सध्याच्या दरानुसार 24 कॅरेट सोन्याचा 1 ग्रॅम भाव 14,433 रुपये, 8 ग्रॅम 1,15,464 रुपये, 10 ग्रॅम (1 तोळा) 1,44,330 रुपये, तर 100 ग्रॅम सोन्याचा भाव 14,43,300 रुपये इतका आहे. त्याचप्रमाणे 22 कॅरेट सोन्याचा 1 ग्रॅम दर 13,230 रुपये, 8 ग्रॅम 1,05,840 रुपये, 10 ग्रॅम (1 तोळा) 1,32,300 रुपये आणि 100 ग्रॅमचा दर 13,23,000 रुपये आहे.


चांदीच्या दरातही घसरण झाली असून, 1 ग्रॅम चांदीचा भाव 235 रुपये, 8 ग्रॅम 1,880 रुपये, 10 ग्रॅम 2,350 रुपये, तर 1 किलो चांदीचा दर 23,500 रुपये इतका झाला आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली आणि डॉलरच्या तुलनेत बदलणारे चलनमूल्य यामुळे दरांमध्ये चढ-उतार होत असून, येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये आणखी बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सणासुदीचा हंगाम आणि लग्नसराई जवळ येत असल्याने अनेक ग्राहक योग्य संधीच्या प्रतीक्षेत होते. अशा परिस्थितीत झालेली ही घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक ठरली असून, दागिने खरेदी आणि गुंतवणुकीसाठी ही अनुकूल संधी मानली जात आहे.