Rain Update : पुण्यात मुसळधार पावसामुळे रस्त्याना नदीचे स्वरूप, जाणून घ्या आजचा अंदाज…


Rain Update पुणे : राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यात पुण्यात अचानक झालेल्या पावसामुळे गणेशभक्तांची एकच धावाधाव पाहायला मिळाली आहे. Rain Update

दौंड, शिरूर, हवेली, जुन्नर, मावळ, पुणे शहर, पिंपरी चिंचवड या पुणे जिल्ह्यातील तालुक्यांत तसेच अहमदनगर, नाशिक , ठाणे, पालघर, रायगड, मुंबई आणि उपनगरे गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर अशा ठिकाणी सायंकाळी ७ नंतर जोरदार पाऊस झाला.

पुणे शहरात रात्री ११ पर्यंत पाऊस कायम होता. मावळ, आंबेगाव, जुन्नर तालुक्यांत काही ठिकाणी अति जोराचा पाऊस झाला. अनेक भागात अचानक येणाऱ्या पुरासारखी, फ्लॅशफ्लड सारखी स्थिती तयार झाली.

माळशेजघाट खंडाळाघाट येथून प्रवास करताना नागरिकांनी सावध राहावे. डोंगरावरून दगड, माती घसरून येण्याची, झाडे पडण्याची शक्यता आहे, असे पुणे वेधशाळेने म्हटले आहे.

पुण्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे गणपती पाहण्यासाठी आलेल्या भाविकांची धावाधाव पाहायला मिळाली.

पुण्याच्या खेड तालुक्यातही सायंकाळपासून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. खेड तालुक्यात पाऊस झाल्याने दुष्काळाचं संकट काही प्रमाणात मिटण्याची शक्यता आहे. या पावसामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, गणेश विसर्जनावरही पावसाचे सावट असून हलक्या किंवा तीव्र सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यंदा मॉन्सून उशीरा आला आणि आता परतीचा प्रवास देखील उशीराच सुरू झाला आहे.

राजस्थानमधून पाऊस परतीला लागला आहे. महाराष्ट्रातील तारीख १० ऑक्टोबर देण्यात आलेली आहे. परंतु, त्यापूर्वीच महाराष्ट्रातून तो परत जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!