Railway News : आता कोकण रेल्वे सुसाट धावणार! सुरू होणार विशेष एक्सप्रेस ट्रेन, राज्यात १४ स्थानकावर थांबा घेणार…

Railway News : लग्नसराई, नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने कोकण रेल्वे कडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. लग्नसराई, नाताळ आणि नववर्ष सेलिब्रेट करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेकजण कोकणात फिरायला जातात. दरम्यान, कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे.
कोकण रेल्वे मार्गावर एक नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार असून ही गाडी अहमदाबाद ते थिवी दरम्यान धावणार आहे. ही एक द्विसाप्ताहिक विशेष गाडी राहणार असून या गाडीचा कोकणात जाणाऱ्या लोकांना मोठा फायदा होईल अशी आशा व्यक्त होत आहे.
दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार या संदर्भातही आता आपण माहिती पाहणार आहोत. Railway News
विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक कसे राहणार?
अहमदाबाद-थिवि ही विशेष द्विसाप्ताहिक रेल्वेगाडी ८ डिसेंबर २०२४ पासून चालवली जात आहे. ही गाडी ८ डिसेंबर ते १ जानेवारी २०२५ या काळात चालवली जाईल. कोकण रेल्वे मार्गांवर चालवल्या जाणाऱ्या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.
कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या द्विसाप्ताहिक रेल्वेगाडीला आणंद, वडोदरा, भरुच, उधना जंक्शन, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या रेल्वे स्थानकाकर थांबा मंजूर करण्यात आला आहे.
नक्कीच कोकणातील बहुतांशी रेल्वे स्थानकावर या एक्सप्रेस ट्रेन ला थांबा मंजूर करण्यात आला असल्याने कोकणात नाताळ तसेच नववर्षाच्या सुट्ट्या सेलिब्रेट करायला जाणाऱ्या पब्लिकला या गाडीचा मोठा फायदा होणार आहे.