Railway News : पुणे- लोणावळा- पुणे दरम्यान आज मेगाब्लॉक, १२ गाड्या रद्द, जाणून घ्या वेळापत्रक…


Railway News पुणे : मध्य रेल्वेच्या वतीने पुणे-लोणावळा दरम्यान इंजीनियरिंग आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता रविवारी (ता . २१) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-लोणावळा- पुणे दरम्यान १२ लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

या दरम्यान गाडी क्रमांक १२१६४ एमजीआर चेन्नई-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस सेक्शनमध्ये दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी मेल/एक्स्प्रेस ट्रेनचे रेग्युलेशन करण्यात येणार आहे.

पुणे-लोणावळा दरम्यान रद्द लोकल गाड्या पुढील प्रमाणे…

पुण्याहून लोणावळा साठी ०९५७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६२ रद्द
पुण्याहून लोणावळा साठी ११.१७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६४रद्द

पुण्याहून लोणावळा साठी १५.०० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६६ रद्द
शिवाजीनगरहून तळेगाव करीता १५. ४७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01588 रद्द

पुण्याहून लोणावळा साठी १६.२५ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६८ रद्द
शिवाजीनगर वरून लोणावळा करीता १७. २० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५७० रद्द

लोणावळा- पुणे दरम्यान रद्द लोकल गाड्या पुढील प्रमाणे..

लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता १०.०५ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५५९ रद्द
लोणावळ्याहून पुणेसाठी १४. ५० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६१ रद्द

तळेगाव येथून पुणे साठी १६.४० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५८९रद्द
लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता १७.३० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६५ रद्द

लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी १८.०८ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६७ रद्द
लोणावळ्याहून पुण्यासाठी १९.०० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६९ रद्द

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!