भारतात रेल्वेचे जाळे होणार अजूनच विस्तारित, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीर ते तेलंगणात अनेक प्रकल्पांचे केले उद्घाटन

नवी दिल्ली : देशातील विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले. यामुळे आता रेल्वेच्या विस्ताराला अजून मोठ्या प्रमाणावर बळ मिळणार आहे. यामध्ये जम्मू रेल्वे विभाग आणि तेलंगणातील एका टर्मिनल स्टेशनचा समावेश आहे.
तसेच पूर्व किनारपट्टी रेल्वेच्या रायगडा रेल्वे विभागाच्या इमारतीची पायाभरणी करण्यात आली. लवकरच ही कामे पूर्णत्वास नेण्यावर सरकारचा भर असणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्ही भारतीय रेल्वेचा विस्तार करत असल्याचे नमूद केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आता आपल्या देशात मेट्रोचे जाळे एक हजार किलोमीटरहून अधिक आहे. गेल्या दशकात भारतीय रेल्वेचा ऐतिहासिक कायापालट झाल्याचे आपण पाहिले आहे. रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये बदल झाला आहे. हा बदल असाच वाढत राहणार आहे.
यामुळे देशाची प्रतिमा बदलली आणि देशवासीयांचे मनोबलही वाढले आहे. रेल्वेच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा, देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेची जोडणी आणि रोजगार निर्मिती आणि उद्योगांना पाठिंबा मिळत आहे.
नरेंद्र मोदी यांनी तेलंगणामधील चारलापल्ली नवीन टर्मिनल स्टेशनच्या ४१३ कोटी रुपये खर्च आला आहे. याचे उद्घाटन केले. यामुळे मेडचल-मलकाजगिरी जिल्ह्याच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे. हे नवीन टर्मिनल स्टेशन पर्यावरणपूरक असेल, प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा असतील.
तसेच जम्मू रेल्वे विभागाचे उद्घाटन पठाणकोट – जम्मू – उधमपूर – श्रीनगर – बारामुल्ला, भोगपूर सिरवाल – पठाणकोट, बटाला – पठाणकोट आणि पठाणकोट ते जोगिंदर नगर विभागांना जोडेल. त्याची लांबी 742.1 किलोमीटर असेल, असेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले.