Railway Bharti : मध्य रेल्वे मुंबई विभागाअंतर्गत माजी सैनिकांकडून गेटमन पदाची भरती…


Railway Bharti : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते लोणावळा दरम्यान यूएनआय-ग्लोबस रिसोर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून माजी सैनिकांकडून २०० गेटमन पदांची भरती करण्यात येणार असून इच्छुक माजी सैनिकांनी १ ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने केले आहे.

भरती प्रक्रिया ३ ऑगस्ट रोजी कल्याण रेल्वे स्टेशन (मुंबई) येथे राबविली जाईल. या भरतीसाठी माजी सैनिकांचे वय ५४ वर्षापेक्षा कमी असावे. कोणत्याही गटाचे सेवानिवृत्त माजी सैनिक अर्ज करू शकतात. नियुक्तीच्या ठिकाणी बंदुकीची आवश्यकता नाही. गेटमनचे काम उभे राहून करावे लागेल. वेतन डिजीआरच्या नियमानुसार देण्यात येईल.

साप्ताहिक रजा ४ दिवस व कामाचे २६ दिवस असतील. कामाची वेळ १२ तास शिफ्टनुसार असेल. निव्वळ वेतन प्रति माह ३२ हजार ६४ रूपये दिले जाईल. वार्षिक पगार वाढ देय राहील. Railway Bharti

इच्छुक माजी सैनिकांनी व्हॉट्सॲप क्रमांक ९८१८८०४७६२, ८२३७८०७४१३ किंवा ८५३०७४५१०४ वर सध्याचे छायाचित्र आणि आधार कार्डचे दोन्ही बाजूची प्रतिमा पाठवावी. उमेदवारांनी व्हॉट्सॲप क्रमांक वर संपर्क करू नये. कंपनी स्वत: उमेदवारांशी संपर्क करेल, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!