Rahul Kalate : मोठी बातमी! शरद पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल, उमेदवारालाच दिली धमकी, नेमकं काय घडलं?

Rahul Kalate : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कालचा शेवटचा दिवस होता अनेकांनी निवडणूक निर्णय कार्यालयात गर्दी केली होती. वेगवेगळ्या पक्षातील उमेदवारांनी आज अर्ज भरला. त्यामुळे निवडणूक निर्णय कार्यालयात अनेकांची मोठी गर्दी होती.
तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या जावेद रशीद शेख यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी काळेवाडी पोलिसांकडे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
सविस्तर माहिती अशी की, मंगळवार (ता. २९) दुपारच्या दरम्यान जावेद शेख हे वंचित बहुजन आघाडी तर्फे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते. त्यावेळी राहुल कलाटे यांनी जावेद शेख यांना तू कशाला फॉर्म भरतो आहेस?, तू फॉर्म भरलास तर मी तुला पाहून घेईल तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन निवडणूक संदर्भातील कागदपत्रे गॅलरी मधून फेकून दिली. Rahul Kalate
दरम्यान, त्यानंतर शेख यांनी काळेवाडी पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी काळेवाडी पोलिसांकडे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेदवारी फॉर्म भरण्याच्या दिवशीच राहुल कलाटे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच या प्रकरणानंतर एकच खळबळ उडाली आहे.