अखेर दर्शना पवारचा खून कसा केला? राहुल हंडोरेने केले कबूल, घटनाक्रम ऐकून तुमच्या अंगावर येईल काटा
पुणे : पुण्यातील वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी तरुणीचा मृतदेह आढळ्याने खळबळ उडाली होती. दर्शना दत्तू पवार असे या मृत तरुणीच नाव असून ती नुकतीच एमपीएससी परिक्षेत पास झाली असून तिची वन परिक्षेत्र अधिकारीपदी निवड झाल्याचेही माहिती मिळाली होती.
त्यावरून पोलिसांनी आपली सूत्रे कामाला लावून दर्शनाच्या मारेकऱ्यांना शोधण्यात यश आले. हत्या झाल्यानंतर तिचा मारेकरी राहुल हंडोरे याला पोलिसांनी अटक केली आहे. दर्शना ही अखेरची तिचा मित्र राहुल सोबत राजगडावर जाताना दिसली होती.
विवाहास नकार दिल्याने झालेल्या वादावादीनंतर रागाच्या भरात दर्शना पवारवर सुरुवातीला कंपासमधील कटर ब्लेडने तीन ते चार वार केले. त्या वेळी कटरचा वार गळ्याला लागल्याने दर्शनाच्या गळ्यातून रक्तस्त्राव सुरु झाला.
त्यानंतर डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याची कबुली आरोपी राहुल हांडोरे याने सोमवारी पोलिसांना दिली. मात्र, माझा दर्शनाला मारण्याचा हेतू नव्हता. माझ्याकडून अनावधानाने हे कृत्य घडले, असे आरोपी राहुलने चौकशी दरम्यान सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
एमपीएससीच्या परीक्षेसाठी आम्ही दोघे एकत्र अभ्यास करत होतो. यादरम्यान मी तिला प्रपोजही केले होते. एमपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी तिला मदत केली. एमपीएससी परीक्षा पास झाल्यावर दर्शनाने लग्नाला नकार दिला.
याचाच राग आल्याने मी तिला संपवायचे ठरविल्याचे राहुल याने चौकशीदरम्यान सांगितले. या घटनेच्या सीसीटीव्हीबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.