राहुल गांधींचा ताफा मणिपूरमध्ये पोलिसांनी अडवला, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मोठा राडा…
मणिपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी हे मदत छावण्यांना भेट देण्यासाठी चुराचांदपूरला जात होते. यावेळी मोठा गोंधळ उडाला. मणिपूर दौऱ्यावर असलेले राहुल गांधी यांना बिष्णुपूर जिल्ह्यात रोखण्यात आले आहे. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
मणिपूरमध्ये सध्या हिंसाचार उफाळला आहे. मंत्री आणि आमदारांच्या घरांना आगी लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष मणिपूरकडे लागले आहे. याठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या विषयावर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर राहुल गांधी हे मणिपूरच्या दौऱ्यावर गेले आहेत. यामुळे दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.
असे असताना गांधी यांचा ताफा इंफाळच्या आधी सुमारे २० किमी अंतरावर असलेल्या बिष्णुपूर जिल्ह्यात थांबविण्यात आला आहे. परिसरातील हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना पाहता पोलिस त्यांना पुढचा दौरा करण्यास परवानगी नाकारला आहे.
त्यामुळे राहुल गांधी यांना अखेर इंफाळला परतले आहेत. यामुळे आता ते पुढे जाणार की नाहीत, हे लवकरच समजेल. छावण्यांना भेट देण्यास राहुल गांधी यांना पोलिसांनी परवानगी नाकारल्याने काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.
त्यांनी घटनास्थळी गोंधळ घातला असून पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्सही तोडण्याचे प्रयत्न कार्यकर्त्यांनी केले आहेत. यामुळे मोठा राडा झाल्याचे दिसून आले.