Rahul Gandhi : मोठी बातमी! पुणे सत्र न्यायालयाचा राहुल गांधींना दणका, ‘या’ प्रकरणी दिला मोठा आदेश


Rahul Gandhi : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत लंडनमध्ये केलेलं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भोवण्याची शक्यता आहे. विनायक दामोदर सावरकर यांच्या नातवाने दाखल केलेल्या तक्रारीत पुण्यातील न्यायालयाने राहुल गांधींना हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

याचिकाकर्त्याच्या वकिलाच्या वतीने दावा करून राहुल गांधी यांच्यावर हिंदुत्व विचारवंताची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुनावणीदरम्यान राहुल गांधी यांचा एकही वकील न्यायालयात हजर झाला नाही. मात्र, या प्रकरणातील तपशीलवार आदेश अद्याप उपलब्ध झालेले नाहीत.

न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) अक्षी जैन यांनी हा आदेश दिला. २०२३ मध्ये लंडनमधील भाषणादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिवंगत स्वातंत्र्यसैनिकाची बदनामी केल्याचा आरोप करणाऱ्या सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीत प्रथमदर्शनी सत्य असल्याचे पुणे पोलिसांनी म्हटल्यानंतर हा आदेश देण्यात आला आहे. पुढील सुनावणी १९ ऑगस्ट २०२४ रोजी होणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. Rahul Gandhi

दरम्यान, तक्रारीत असे म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी त्यांच्या एका भाषणादरम्यान पाच-सहा मित्रांसोबत एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण केल्याचा दावा व्ही.डी. सावरकर यांच्या पुस्तकात केला आहे.

सात्यकी सावरकर यांनी तक्रारीत म्हटले आहे की, अशी कोणतीही घटना आजवर घडली नाही किंवा कोणत्याही पुस्तकात लिहिलेली नाही. त्यांनी राहुल गांधींचे आरोप खोटे आणि काल्पनिक असल्याचे म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!